समजा तुम्हांला कोणी विचारले कि "जगातली सर्वात "पॉवरफुल" टेक्नोलॉजि कुठली?" तर क्षणाचाही विलंब न लावता खुषाल सांगा - "नेटवर्किंग" आणि समोरचा तरीही मानायला तयार नसेल तर ..... नेटवर्क पोर्ट उचकटून काढा त्याच्या PC मधून ..... लग्गेच समजेल!!! :-D मस्करीचा भाग सोडा, पण खरच नेटवर्किंग शिवाय जगाचा श्वास थांबेल. कारण जगाच्या कानाकोपर्यात आज नेटवर्किंग पोहोचले आहे. व्हॉइस - व्हिडीओ - डेटा तीनही गोष्टि आज केवळ नेटवर्किंगमुळे जगातल्या एका कोपर्यापासून दुसर्या कोपर्यापर्यंत पोहोचतात. आपण फोन वरती बोलतो त्याचे डिजिटल सिग्नलमध्ये रुपांतर होते व जमीनीवर - समुद्रातून हज्जारो किमी पसरलेल्या फायबर ऑप्टिक्समधून प्रवास करुन ते दुसर्याला ऐकु जाते, आपण इ-मेल पाठवतो त्यात टेक्स्ट, फोटो, ऑडिओ, व्हिडिओ या आणि अश्या अनेक गोष्टि अटॅच करुन पाठवतो, आपण तासन तास कि बोर्ड बडवून चॅट करतो, जगातल्या कुठल्याश्या एका ATM सेंटरमधुन पैसे काढतो त्याची नोंद आपल्या बॅंकच्या खात्यात होते, जगाच्या दोन टोकांवर असलेल्या व्यक्ती समोरा समोर बसून बोलावे तसे व्हिडिओ कॉन्फर्न्सिंग करतात, हॅकर्स एखादि साईट हॅक करतात, सर्च इंजिन वरती एखादा शब्द टाईप करुन एन्टर कि दाबली कि १-२ सेकंदात काही लाख रीजल्ट तो तुमच्या समोर ठेवतो ..... या सगळ्याऽऽ मागे "नेटवर्किंग" आहे. आणि आत्ता तुम्हि माझा लेख वाचता आहात तेही नेटवर्किंग मुळेच. नेटवर्क पोर्ट मधली वायर बाजूला काढा कि तुमच्याही कंप्युटरचा "डब्बा" झालाच .... मग खेळा त्यावर व्हिडिओ गेम. :-p
मी तर म्हणिन कि आर्मी नंतर नेटवर्किंगवालेच देश चालवतात .... अतिरंजित करतोय असं वाटत असेल तर एक शक्यता विचारात घ्या आपली NSE, BSE आणि आपल्यासारखीच जगभरात वेगवेगळी "एक्सचेंज" आहेत. समजा टेक्निकल कारणांनी किंवा मानव निर्मित कारणांनी यांची साईट त्याच्या लाखो मेंबर्सना/गुंतवणूकदारांना ती एक तास वापरता आली नाहि .... काही करोडचे नुकसान होईल. एक दिवस नाही वापरता आली काहि शे करोडचे नुकसान होईल, काही दिवस वापरता आली नाही तर काही हजार करोड रुपयांचे नुकसान होईल व आठवडाभर बंद राहीली तर अर्थव्यवस्थेला धक्का लागेल. आणि एकाच देशाच्या नव्हे तर जगभरातील अर्थ व्यवस्थेला फटका बसेल कारण आज जगभरातील सगळि एक्सचेंज्स एकमेकांना जोडलेली आहेत. अर्थात असं होत नाही कारण त्याच्या मागे आधीच या सगळ्याचा विचार करुन त्यावर आगाऊ उपाय योजना केल्या असतात. पण हे नाकारता नक्किच येत नाहि. अनेकदा या साईट खरच दिवसभरा करता मिळत नाहीत त्या मागची अनेक तांत्रिक कारणे असतात ती कधीतरी सांगेनच. पण सांगण्याचा मुद्दा नेटवर्किंगवाले "लई भारी" आहेत. थोडक्यात "नॉट वर्किंग" असलेल्या गोष्टि नेटवर्किंगमुळे चालतात म्हणायला हरकत नाही.
पण नेटवर्किंग म्हणजे नुसते कंप्युटरच्या मागचा RJ-45 चा कनेक्टर लावणे नव्हे. नेटवर्किंग असीम आहे, अजून नवे शोध लागतच आहेत लागतच राहतील. इथे मला जमेल तशी नेटवर्किंगची माहीती शक्य तितकि सोप्पी करुन तुम्हांला देत जाईन. मी त्यातला तज्ञ नाही पण चांगला विद्यार्थी नक्किच आहे. सो एन्जॉऽऽऽय!
- सौरभ वैशंपायन.

2 comments:
Lage Raho!
धन्यवाद सौरभ.
तुझी नॉट वर्कींग ते नेटवर्कींग ब्लॉगची कल्पना चांगली आहे. मला आवडली. खरं तर कोणाला ती आवडली किंवा नावडली यापेक्षा अशा माहितीपर मराठी लेखांची गरज महाराष्ट्रातल्या (विशेषतः ग्रामीण व तालुका पातळीवरच्या) विद्यार्थ्यांना खूप आहे. आपण असं समजतो की आता गुगलवर शोधून सगळं मिळतं, सगळं ज्ञान नेटवर उपलब्ध आहे, तर ते मराठीत वेगळं देण्याचं कारण काय? याबाबतीतला माझा अनुभव हा की बरेचदा इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मराठी मुलांनाही मराठीत वाचायचं असतं. त्यासाठी ते मराठी पुस्तकांच्या शोधातही असतात. त्याचं कारण सरळ आहे की ते वाचक मराठी वातावरणात वावरत असतात. इंग्रजी वाचताना त्यांना ते परक्याच्या कंपनीत आहेत असं वाटतं. आणि, मराठी वाचताना त्यांना आपलेपणा व निर्धास्तपणा असतो. मराठी माध्यमातली मुलं तर इंग्रजी पुस्तकं हातात धरायलाच नाखूष असतात. तात्पर्य, संगणकविषयक मराठी लेखन ही महाराष्ट्रात तरी आजची गरज आहे.
तुझ्या तीन लेखांमध्ये मला चांगला ओघ दिसला. भाषा ही तुझी अडचण नाही. विषय मुलांच्या (किंवा, शिकणाराच्या) विशिष्ट पातळीवर जाऊन, उदाहरणे देत, हलके व हसतखेळत समजावणे हा मुद्दा शिल्लक राहतो. पहिले पाच सात लेख लिहून झाले की त्याचा अंदाज येतो. मी जेव्हा संगणकविषयक लिहू लागलो तेव्हा मुलांसाठी बालकथा पुर्वी लिहील्याची पार्श्वभूमी उपयोगाला आली. आपल्याला बरच माहीत असलं (किंवा माहित करून घेतलं असलं) तरी ज्याला सांगायचय त्याला सध्या काहीच माहिती नाही हे एकीकडे गृहित धरायचं (म्हणजे आपल्या माहिती प्रसारणाला बॉटलनेक उभारून अडवायचं आणि स्पुन फीडींग चालू करायचं)आणि दुसरीकडे वाचणाराकडे मर्यादित संयम आहे हे लक्षात घेऊन त्याला कंटाळा येण्याआधी तो विषय त्याच्या गळी उतरवायचा हे तंत्र पुढे पुढे लिहीणाराला आत्मसात होतं असा माझा अनुभव आहे. तसं लिहीण्यासाठी एक पेशन्स लागतो, तो सरावाने विकसित होतो. मी उपदेश करीत नसून माझा अनुभव सांगतो आहे हे तुझ्या लक्षात आले असेल.
ह्या लिखाणात इंग्रजी शब्द (विशेषतः technical terms वगैरे) येणं क्रमप्राप्त असतं. त्याला उपाय नाही. त्यासाठी संस्कृतप्रचुर शब्द अजिबात घेऊ नये या मताचा मी आहे. कारण ते समजून घेण्यापेक्षा इंग्रजी समजणे वाचकांना सोपे वाटते.
मराठीत तंत्रज्ञान विषयक लिहीणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही नाहीत. जे आहेत ते नियमित लिहीत नाहीत. तुझ्यासारखा कोणी ताज्या दमाचा लेखक पुढे येईल तर वाचकांची मोठीच सोय होईल.
अधिक लांबवत नाही. माझ्या शुभेच्छा.
धन्यवाद.
- माधव शिरवळकर
Post a Comment